सोयाबीनचा बाजारात नेण्याआधीच बाजार उठलाय... पुराच्या पाण्यात सोयाबीन त्याच्या धन्याला सोबत घेऊन बुडालंय...
नैसर्गिक संकटानं मराठवाड्यातील माणसांच्या आयुष्यात अनेक आर्थिक प्रश्न निर्माण केलेत. प्रपंचाचा गाडाच बंद पडलाय. त्याची सोडवणूक होत नाही म्हणून त्याच्यापुढे हतबल होऊन तरणीबांड पोरंही गुडघे टेकताहेत. प्रत्येक नैसर्गिक आपत्तीनंतर मराठवाड्यातील शेतकऱ्याच्या गळ्याभोवती आवळला जाणारा फास घट्ट होत जातो, हा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे त्याला वेळीच मदत मिळायला हवी. आज शेताचा मसणवटा झालाय.......